सोनगीर गावातील दोडाई रोडवरील सोमेश्वर महादेव मंदिरासमोरील बंद टपरीजवळ अंदाजे ३५ वर्षीय अनोळखी तरुणाचा मृतदेह गुरुवारी दुपारी आढळून आला. स्थानिकांनी त्याला रुग्णवाहिकेतून धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृताची ओळख पटलेली नसून सोनगीर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पीएसआय संदीप ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला आहे.