स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज तुर्भे येथे माथाडी कामगारांचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील उपस्थिती दर्शवली. मात्र या मेळाव्यानंतर एक घटना घडली असून माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील हे कोसळले आहेत. या घटनेत त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीमध्ये चढताना त्यांचा तोल गेला आणि ते कोसळले. ही घटना आज दिनांक 25 सप्टेंबर रोजी दुपारी 1 च्या सुमारास घडली.