राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विरार येथील रमाबाई अपार्टमेंट दुर्घटना स्थळाची भेट देत पाहणी केली. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी संपूर्ण बचाव कार्याचा व परिस्थितीचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली याप्रसंगी खासदार डॉ.हेमंत सवरा आमदार स्नेहा दुबे पंडित, आमदार राजन नाईक, महानगरपालिका आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.