मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, ९ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजता मंत्रालय येथे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत ९१,६५,१५६ शेतकऱ्यांना १८९२.६१ कोटी रुपयांच्या सातव्या हप्त्याचे वितरण केले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते.