हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत वर्धा येथील स्थानिक गुन्हे शाखा पथकाने मांडगाव व वाघोली या दोन वेगवेगळ्या कार्यवाहीमध्ये शासनाने प्रतिबंधीत केलेल्या सुगंधीत तंबाखु व पान मसाला चा साठा वाहनासह ५ लाख ६७ हजार ९६५ रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून दोघांना अटक केल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. प्राप्त माहितीनुसार ४ सप्टेंबर रात्रीच्या सुमारास वर्धा येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असतांना, गुप्त माहितीच्या आधारे दोन ठिकाणी कारवाई केली.