दहेगाव येथे तसेच कळमेश्वर तालुक्यातील अनेक गावांमध्ये अदानी कंपनी समूहातर्फे कोळसा प्रकल्प राबविण्यात येणार होता त्या संदर्भात लोकांनी टोकाचे पाऊल उचलले असून अदानी प्रकल्प रद्द करा कोळसा प्रकल्प रद्द करा अशी मागणी नागरिकांकडून व शेतकऱ्यांकडून केली जात आहे यासाठी आज बुधवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळ नागपूर यांच्या पर्यावरण विषयक जाहीर लोक सुनावणी मध्ये नागरिकांनी ही बाजू घेतली यावेळी शेकडो नागरिक उपस्थित होते