नागपूर अमरावती महामार्गावरील बाजारगाव जवळ असलेल्या सोलार एक्सप्लोजिव्हमध्ये 4 सप्टेंबरला मध्यरात्री 12:34 च्या सुमारास भीषण स्फोट झाला यात सुपरवायझरचा मृत्यू झाला तर 9 कामगार जखमी झाले यातील चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतकाचे नाव मयूर गणवीर असे सांगण्यात आले आहे. कंपनीच्या पीपी प्लांटमध्ये हा स्फोट झाला. हा स्फ़ोट इतका भीषण होता की बाजार गाव सह शिवा सावंगा आणि नजीकच्या दहा गावांना याचे हादरे बसले. तसेच कंपनीतील लाखो रुपयांचे उपकरणे आणि साहित्य जळून खाक झाले.