राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी,कर्मचारी संघटना एकत्रीकरण समिती महा. यांनी केलेल्या बेमुदत काम बंद आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा दिला. आपल्या मागण्या रास्त आहेत मी आपल्या सोबत आहो. आपल्या मागण्या शासन दरबारी मांडून आपल्याला न्याय देण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचेही यावेळी सांगितले.आपण सर्व जनतेची सेवा करता याची जाणीव आहे,परंतु भाजपा सरकारला का कळत नाही हा मोठा प्रश्न पडतो? आपल्या सर्व बंधू आणि भागिणींना रस्त्यावर उतरवण्याचे काम ही भाजप सरकार करीत आहे.अशी टीका खासदार पडोळेंनी केली