सकाळच्या सुमारास शेतशिवारातील पिकांची पाहणी करण्यासाठी जात असताना घरासमोरील तलावाच्या पाळीवरून अचानक तोल गेल्याने एका 54 वर्षीय इसमाचा तलावातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. ही घटना १३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास पलांदूर येथे उघडकीस आली. कृष्णा रामाजी नंदनवार (५४) रा पालांदूर असे घटनेतील मृतक इसमाचे नाव आहे. या घटनेची माहिती पालांदूर येथील नागरिकांना होताच नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली.