डीजेला फाटा देत शहरातील दणकेश्वर गणेश मंडळाच्या गणरायांचे दि. 25 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजताच्या दरम्यान पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढून आगमन झाले. यावेळी पाटणी चौक येथे फटाक्याची आतीषबाजी करुन गणरायांचे मोठ्या जल्लोषात स्वागत झाले. युवक व युवतींचे ढोल-ताशे पथक, वारकरी मुलांचा टाळ मृंदग, लहान मुलींचे लेझीम पथक, संबळ वादन, पारंपारीक डफडे वादन व आकर्षक सजविलेल्या बैलगाडीमध्ये मुषकराज्याच्या खांद्यावरील पालखीमध्ये बसलेल्या गणरायाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.