ठाण्यातील पलावा पुलावरून माजी आमदार राजू पाटील यांनी पुन्हा नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर आज दिनांक ९ सप्टेंबर रोजी दुपारी १ च्या सुमारास एक्सद्वारे निशाणा साधला आहे. ४ जुलै रोजी उद्घाटन होऊन दोन तासातच खड्डे पडलेला पलावा पुल दोन महिन्यांनंतरही तसाच आहे. हे खड्डे म्हणजे बापबेट्यांच्या भ्रष्टाचाराचा उत्तम नमुना आहे अस राजू पाटील म्हणाले आहेत. यावेळी राजू पाटील यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे.