भगवान श्री झुलेलाल चालीसा महोत्सवाचे श्री झुलेलाल मंदिर सिंधी कॉलोनी गोंदिया येथे आयोजन करण्यात आले होते. भगवान श्री झुलेलाल चालीसा महोत्सवा च्या समारोपप्रसंगी गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांनी पवित्र ज्योतीचे दर्शन घेतले. यावेळी आमदार अग्रवाल यांनी भगवान श्री झुलेलाल चालीसा महोत्सव प्रसंगी पूजाअर्चना करून आशीर्वाद घेतले. यावेळी मोठ्या संख्येत परिसरातील भाविक भक्तगण उपस्थित होते.