घोडबंदर रोडवर होणारी वाहतूक कोंडी, रस्त्यावर पडलेले खड्डे आणि अवजड वाहनांमुळे होणारे प्रदूषण या विरोधात आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास आनंद नगर येथे स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. या नागरिकांनी हातात निषेध असे फलक घेऊन शांततेत आंदोलन केलं आहे. तसेच आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा देखील रहिवाशांनी दिला आहे.