दरवर्षीप्रमाणे यावर्षी सूद्धा दि.२३ आगस्ट शनिवार रोजी सांयकाळी ४ ते ६ वाज़े दरम्यान बाजार चौक नगरपंचायत पटांगणात भव्य तान्हा पोळा उत्सव व बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता या बालगोपालांचा उत्सह सोहळ्यात माजी खा अशोक नेते व आमदार डॉ मिलींद नरोटे हे सूद्धा सहभागी झाले होते.कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक आशिष पिपरे, सामाजिक कार्यकर्ते अमोल आईचवार,न.पं. सभापती सोनाली ताई पिपरे, नगरसेविका प्रेमाताई आईचंवार, रमेश अधिकारी यानी पूढाकार घेत केले होते.