बीड तालुक्यातील लिंबागणेश पंचक्रोशीतील मराठा बांधवांनी मुंबई आंदोलनासाठी जय्यत तयारी केली असून मंगळवार दि.26 ऑगस्ट रोजी, दुपारी 12 वाजता मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.मराठा–कुणबी समाज एकच असल्याची अंमलबजावणी, सरसकट गुन्हे मागे घेणे आणि कायद्यानुसार आरक्षण या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली २९ ऑगस्ट रोजी मुंबई आझाद मैदानावर हे आंदोलन होणार आहे.आतापर्यंत ५८ लाख कुणबी नोंदी उपलब्ध झाल्याने मराठा समाजाला आरक्षणाच्या दिशेने मोठा फायदा झाला आहे. भविष्यात कायमस्वरूपी आरक