वाळूज परिसरातील छोट्या पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे दरवर्षी आषाढी एकादशीला मोठी यात्रा भरते. यंदाच्या आषाढी एकादशीचे औचित्य साधून एमजीएम विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या १०० स्वयंसेवकांनी छोट्या पंढरपुरातील वारीमध्ये आपला सहभाग नोंदवत १८ जुलै रोजी सकाळी १० पासून स्वच्छतादूत म्हणून काम केले. अशी माहिती एम जी एम तर्फे सायंकाळी ७ वाजता देण्यात आली. विद्यापीठाच्या विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी यावेळी पर्यावरणपुरक संदेश देत हा परिसर स्वच्छ करण्याचे कामही केले.