भगवान श्री चक्रधर स्वामी यांची जयंती आज २५ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली.भगवान श्री चक्रधर स्वामी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांच्या हस्ते श्री चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी राजेंद्र पोळ, सुहासिनी गोणेवार, समाधान गायकवाड आदी उपस्थित होते.