रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप,आयटीआय रोड आणि मिरजोळे पाडावेवाडी येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणार्या तिघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई 1 डिसेंबर रोजी दुपारी 1 ते सायंकाळी 7 वा. कालावधीत करण्यात आली. सुरेश पर्शूराम पाटील (45,रा.नाचणे,रत्नागिरी), वैभव कृष्णा चव्हाण (29,रा.खडपे वठार,रत्नागिरी) आणि नेहरु दिलीप राठोड (26,मुळ रा.विजापूर,कर्नाटक सध्या रा.कुवारबाव,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तीन संशयितांची नावे आहेत.