धुळे शहरातील एका सहा वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम बळवंत नथ्थू निकम याला धुळे न्यायालयाने २० वर्षांची सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. न्यायाधीश श्रीमती वाय. जी. देशमुख यांनी हा निकाल दिला. आरोपीने खाऊ देण्याच्या बहाण्याने पीडितेला घरात बोलावून अत्याचार केला होता. या प्रकरणी देवपूर पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारी वकील ए. एस. सानप यांनी प्रभावी युक्तिवाद केला.