ढवळस (ता. माढा) येथील जगदंबा देवी मंदिरात सोमवार, २५ ऑगस्ट रात्री ते मंगळवार, २६ रोजीच्या पहाटेच्या दरम्यान चोरट्यांनी मंदिराच्या गाभाऱ्याचे कुलूप तोडून ६९,००० रुपयांच्या दागिन्यांची आणि साहित्याची चोरी केली. या प्रकरणी ज्ञानदेव हरिदास अनभुले (संस्थापक अध्यक्ष, जगदंबा देवस्थान ट्रस्ट, ढवळस) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.