माढा तालुक्यातील वेणेगाव (टें)येथील जय मल्हार कला केंद्रावर घडलेल्या गोळीबाराने माढा तालुक्यात खळबळ उडाली होती. या घटनेत जखमी देवा कोठावळे यांच्यावर १९ वर्षीय अभिषेक दादासाहेब इंगळे (रा. शेगाव दुमाला हल्ली रा. रामबाग पंढरपूर) याने गोळी झाडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यामध्ये फरार असलेला संशयित आरोपी ज्ञानेश्वर उर्फ महाराज पांडुरंग कडलास्कर याला पकडण्यासाठी दोन पोलिस पथके रवाना झाली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली आहे.