हैदराबाद वरून रायपुरकडे प्रवाशांना घेऊन जात असलेल्या खाजगी बसच्या चालकाचा ट्रकला ओव्हरटेक करताना बस वरून नियंत्रण सुटल्याने ट्रकला धडक बसून अपघात झाल्याची घटना आज दि. 27 ऑगस्ट रोजी सकाळी 6.15 वाजताच्या सुमारास कोहमारा नवेगावबांध मार्गावर सडक अर्जुनी तालुक्यातील चिखली गावाजवळ घडली या अपघातात बसमधून प्रवास करणारे सहा प्रवासी गंभीर जखमी झाले असून जखमीत एका सहा महिन्याच्या चिमुकलीचा समावेश आहे सर्व जखमींवर सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून गोंदिया येथील केटीएस जिल्हा रुग