अहिल्यानगर | मोहोळे पिंपळगाव पिसा येथे गावठी दारूची अड्डे बंद करण्याची मागणी मोहोळे पिंपळगाव पिसा (ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) येथील गावकऱ्यांनी गावातील अवैध गावठी दारूचे अड्डे कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे आज दुपारी दोन वाजता केली आहे. गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, गावात बेकायदेशीर पद्धतीने दारू विक्री होत असून त्यामुळे अनेक शाळकरी मुलांचे शिक्षण बिघडत आहे. तरुण वर्ग व्यसनाधीन होत असून आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे.