भुसावळ : येथील रेल्वे स्टेशन जवळील एटीएम जवळून अझरुद्दीन निजामुद्दीन शेख (रा. किराणा दुकान गोसिया नगर भुसावळ) यांची हिरो होंडा कंपनीची लाल काळ रंगाची एचएफ डीलक्स (एमएच 11 बीव्ही 5886) ही दुचाकी चोरीस गेली होती. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्याचा पोलिसांनी यशस्वी तपास करात परराज्यातील चारट्यांना अटक केली आहे. तसेच विविध गुन्हातील चोरीच्या १६ मोटारसायकली देखील जप्त करण्यात आल्या असल्याची माहिती दि. १ सप्टेंबर रोजी बाजारपेठ पोलिसांनी दिली.