पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावरील एका कामगाराला धमकी देत पाच हजाररुपयांची खंडणीची मागणी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आरोपी अतुल तांबे (वय १९, रा. खंडोबा माळ, चाकण), सोहम माने (वय १८, रा.वराळे, ता. खेड), ओंकार बागल (वय २०, रा. देहूगाव ता. हवेली) यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.