पोलीस आणि तरुणांमध्ये अंडा भुर्जीची गाडी बंद करण्यावरून वादावादी झाली असून पोलिसांकडून पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकाराचे व्हिडीओ शूटिंग केल्यामुळे तरुणाच्या भावावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांची कारवाई अन्यायकारक आणि पूर्वग्रहदूषित असल्याचा आरोप या तरुणांनी केला आहे.