चिंचवड येथील एका चित्रपटगृहात सिनेमा पाहताना 'स्टोरी आधी सांगू नका' आणि शांत बसण्याची विनंती केल्यामुळे एका २९ वर्षीय तरुणाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित तरुणाने चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, एका दाम्पत्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.