ठाण्यातील कॅडबरी जंक्शन येथे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर करडी नजर असणार आहे. त्यासाठी येथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. वाहतुकीचा कोणताही नियम मोडल्यास ऑनलाईन दंड आकारला जाणार आहे. त्यासाठी आज दिनांक १२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ च्या सुमारास पोलिसांनी जनजागृती केली. या जनजागृती मोहिमेत वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाठ आणि शाळेचे विद्यार्थी देखील सहभागी झाले होते.