शिरडी शहरात वाहतुकीतील शिस्तभंग करणाऱ्यांवर पोलिसांनी धडधाकेबाज कारवाई केली असून अप्पर पोलिस अधीक्षकांच्या पथकासह शिरडी वाहतूक शाखा अॅक्शन मोडवर आली. विना नंबर प्लेट धावणारी वाहने, मॉडिफाई सायलेन्सर लावलेले बाईकर्स, नो पार्किंगमध्ये उभे राहणारे अप्परिक्षा आणि फॅन्सी नंबर प्लेट असणाऱ्या वाहनांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला असून एकाच दिवशी तब्बल 70 हून अधिक वाहनांवर कारवाई करण्यात आली तर काही दुचाकी आणि अप्परिक्षा पोलिसांनी थेट ताब्यात घेतल्या आहेत.