गडचिरोली जिल्हा नियोजन भवन येथे दिनांक ११ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्हास्तरीय शिक्षक गुणगौरव पुरस्कार वितरण व सत्कार सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे जीवन घडवण्यासाठी घेतलेल्या अथक परिश्रमांचा गौरव करण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. शिक्षकांचा सन्मान हा राष्ट्राच्या उज्वल भविष्याचा सन्मान आहे, या भावनेने हा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी गुणगौरव पुरस्कार प्राप्त करणाऱ्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले. समाजात शिक्षकांचे महत्त्व अनमोल आहे.