केज शहरात शनिवार दि 6 सप्टेंबर रोजी, दुपारी 12 वाजल्यापासून गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे. चौका-चौकात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसोबतच यंदा ड्रोन, वॉच टॉवर आणि टोईंग व्हॅनचाही वापर केला जात आहे. मिरवणुकीत दंगल नियंत्रक पथक, गृह रक्षक दल आणि शस्त्रसज्ज जवान तैनात आहेत.पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी सांगितले की, “गणेश भक्तांनी शांततेत आणि कायद्याचे पालन करत उत्सवाचा आनंद घ्यावा. गोंधळ घालणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल.” असा इशारा दिला आहे.