24 ऑगस्टला रात्री 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे हुडकेश्वर हद्दीतील न्यू सुभेदार लेआउट येथे राहणारे पुरुषोत्तम शिंगाडे हे घराला कुलूप लावून पोळा सणानिमित्त पचखेडी येथे गेले असता अज्ञात आरोपीने त्यांच्या घरातून रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण एक लाख 51 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला याप्रकारणी प्राप्त तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.