जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त निमगुळ येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे जनजागृती कार्यक्रम झाला. जिल्हा पदाधिकारी दिलीप खिवसरा यांनी मार्गदर्शन करताना तरुण पिढी ताण, वाद किंवा व्यसनामुळे आत्महत्या करत असल्याचे सांगितले. अशावेळी संवाद साधणे, दुःख वाटून घेणे, पालकांनी मुलांशी मैत्रीपूर्ण वागणे, व्यसनांपासून दूर राहणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. आयुष्य सुंदर असून योग्य समुपदेशनाने समस्या सोडवता येतात, असे आवाहन त्यांनी केले.