शहरातील राजापेठ आणि फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन स्वतंत्र घटनांत दोन जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. मृतकांची नावे सरोज कॉलनी, सूतगिरणी येथील आनंद किशनराव तायडे (४५) आणि राहुल नगर येथील संदीप श्रीकृष्ण शेंडे (३८) अशी आहेत. राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सरोज कॉलनी, सूतगिरणी येथे राहणारे आनंद तायडे यांना दारूचे व्यसन होते. १ सप्टेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास ते दारूच्या नशेत घरी आले. यावरून पत्नीने त्यांना सुनावले व महालक्ष्मीच्या दिवशी दारू पिऊन का आलात असे विचारले. त्य