मोताळा तालुक्यात येत असलेला पलढग मध्यम प्रकल्प आज सहा सप्टेंबर रोजी 100% क्षमतेने भरल्याने नदी काठच्या १९ गावांना सतर्क राहण्याचा इशारा संबंधित प्रशासनाने दिला आहे. यामध्ये मोताळा मलकापूर आणि नांदुरा तालुक्यातील तारापूर,कोथळी, सुलतानपूर, वरूड,तांदुळवाडी, शेंबा बुद्रुक, शेंबाखुर्द, टाकरखेड, डोलखेड, निमखेड, पिंपळखुटा खुर्द, पिंपळखुटा बुद्रुक, लासुरा,चांदुर बिस्वा, सानपुडी,वडनेर भोलजी, बुर्टी, वरखेड या गावाचा समावेश आहे.