पालघर- मनोर मार्गावर ट्रकचा अपघात घडला आहे. मनोरहून पालघरच्या दिशेने येणाऱ्या ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि वाघोबा कखिंड परिसरात ट्रक उलटल्याने हा अपघात घडला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ट्रकचालक किरकोळ जखमी झाला. अपघातामुळे पालघर मनोर मार्गावर वाघोबा खंड परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले अपघातग्रस्त वाहन बाजूला सारून काहीवेळाने वाहतूक पूर्ववत करण्यात आली. अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.