शिवसेना शिंदे गटाच्या वतीने डहाणू येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. डहाणू, तलासरी तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा उपनेते निलेश सांबरे, उपनेते ज्योती मेहेर, जिल्हाप्रमुख कुंदन संखे, सहसंपर्कप्रमुख केदार काळे, जिल्हा महिला संघटिका वैदेही वाढाण, माजी आमदार अमित घोडा आदींसह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष बांधणी संघटनात्मक बांधणी बाबत यावेळी चर्चा करून उपस्थित त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.