कोपरगावच्या श्रीक्षेत्र कुंभारी येथे योगीराज गंगागिरीजी महाराज यांचा २०२६ अखंड हरिनाम सप्ताह मिळावा म्हणून कुंभारी पंचक्रोशीतील हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीत महंत राघवेश्वरानंद गिरी महाराज यांनी गोदावरी धाम सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराजांकडे मागणी केली आहे. सरला बेटावर सप्ताह मागणी करण्यासाठी गावोगावीचे लोक येत असतात.त्यानुसार आज कुंभारी ग्रामस्थांनी सप्ताहाची मागणी केली.