पुण्यातील रामवाडी परिसरातील आयटी पार्क समोर पहाटे तीनच्या सुमारास दुचाकीवर बसलेल्या तरुणावर दोघांनी कोयता आणि तलवारीने प्राणघातक हल्ला केला. हल्ल्याचे कारण अद्याप समजलेले नाही. अलीकडच्या काळात पुण्यात अशा हल्ल्यांच्या घटना वाढत असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.