धुळे शहराजवळ नगाव गावात धुळे स्थानिक गुन्हे शाखेने विदेशी दारूने भरलेला कंटेनर पकडत ६३ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गोव्यातून गुजरातकडे बेकायदेशीररीत्या दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून कारवाई केली. कंटेनरमध्ये ९५० बॉक्स ‘रॉयल ब्ल्यू मॉल्ट व्हिस्की’ आढळले. सुधाकर माने (रा. सांगली) आणि विनायक सपताळे (रा. सोलापूर) या दोघांना अटक झाली. कारवाई पोलिस अधीक्षक धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.