दागोटोला येथे मजुरीच्या पैशावरून झालेल्या वादातून 21 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता गजेन्द्र जांभुळकर (51) यांना फावड्याने मारहाण करून जखमी करण्यात आले. फिर्यादीने आरोपींना एक दिवसाचे मजुरीचे पैसे कमी दिल्याबाबत हटकले असता आरोपींनी वाद घालत शिवीगाळ केली. यावेळी भुमेश्वर साउसकर यांनी फावड्याने डोक्यावर वार केला तर त्याचा भाऊ हेमंत साउसकर यांनी धमकी दिली. या प्रकरणी 22 ऑगस्ट रोजी मध्यरात्री गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.