माहिती विचारण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना धमकी देण्याचा अकलूज येथे दुर्दैवी प्रकार घडला असल्याची प्रतिक्रिया माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली आहे. आज सोमवार दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सोशल मीडियाद्वारे व्हिडिओ शेअर करत त्यांनी माहिती दिली आहे. याप्रकरणी अकलूज डीवायएसपी यांनी लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणी मोहिते पाटील यांनी केली आहे.