जिल्हा बँकेत केडरमधून सचिवांना दिले सहकार आयुक्तांच्या हस्ते नियुक्तीपत्र २००९ साली विकास सेवा सोसायटीचे सचिव केडर बरखास्त झाले होते. ते पुन्हा स्थापित करण्यासाठी जिल्हा बँकेचे चेअरमन खासदार नितीन काका पाटील, व्हाईस चेअरमन अनिल देसाई, माजी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राज्याचे सहकारमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर केडरमधून सचिव निवडीची प्रक्रिया सुरु झाली..