सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी महसूल प्रशासन अधिक गतिमान, लोकाभिमुख व कार्यक्षम होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी जन्मदिनी दि.17 सप्टेंबर 2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दि.02 ऑक्टोबर, 2025 या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत "सेवा पंधरवडा" साजरा करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालय रायगड यांनी आज शुक्रवारी दुपारी २ च्या सुमारास दिली.