वाटद-खंडाळा येथे प्रेयसी भक्ती मयेकरचा वायरने गळा आवळून खून केल्या प्रकरणातील तसेच सिताराम विर याला ज्याठिकाणी जबर मारहाण करण्यात आली ते घटनास्थळ असलेला सायली देशी बार पोलिस विभागाच्या अहवालावरुन उत्पादन शुल्क विभागाकडून गुरुवारी सिल करण्यात आला. दरम्यान, या बारमधूनच मयत भक्ती मयेकरचा मोबाईल हस्तगत करण्यातही शहर पोलिसांना यश आले आहे. भक्ती मयेकरचा मोबाईल पोलिसांच्या हाती लागल्यामुळे या गुन्हयातील अनेक गोष्टी उघडकीस येण्याची शक्यता आहे.