अमेरिकेच्या दबावाखाली केंद्र सरकारने पुन्हा एकदा देशातील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलंय. परदेशातून आयात होणाऱ्या कापसावरील सीमा शुल्क रद्द करून अमेरिकन निर्यातदारांच चांगभलं केल.देशातील शेतकरी रास्त भावासाठी रस्त्यावर उतरलेल्या असताना हा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळणार नाही.सरकारचे हे धोरण शेतीला उद्ध्वस्त करण्याचे काम करतंय.