मोह फुलाच्या हातभट्टीच्या दारूची साठेबाजी करून विक्री करीत असल्याच्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका ३८ वर्षीय इसमाच्या ताब्यातून २० लिटर मोह फुलाची हातभट्टीची दारू पकडल्याची घटना घडली. ही घटना २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत अड्याळ पोलिसांनी राहुल भीमराव गणवीर (३८) रा नवरगाव यांच्या विरोधात अड्याळ पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत अड्याळ पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून अंदाजे किमती ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.