नगर-मनमाड महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला असून आज गुरुवारी सायंकाळी राहुरी फॅक्टरी येथील विवाहित तरुणाचा या रस्त्यावर बळी गेला. हॉटेल क्रांतीसमोर घडलेल्या या अपघातात दुचाकीवरून जात नितीन उर्फ पप्पू बापूसाहेब ढोकणे(वय-३५, रा.अंबिकानगर, राहुरी फॅक्टरी) या विवाहित तरुणाला मालवाहतूक ट्रक क्रमांक Rj 11 GC 0012 ने चिरडले. अपघात इतका भीषण होता की नितीन ढोकने या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.