सिंदी (रेल्वे) शहरालगतच्या ड्रायपोर्ट परिसरात रविवारी (ता.31) ला सायंकाळी 5.30 ते 6 वाजताच्या दरम्यान शेळ्या चारणाऱ्या महिलेच्या अंगावर वीज पडून महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. शांता सुधाकर वरठी (वय ५०) रा. परसोडी असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी रात्री 7.30 वाजता आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली. अशी माहिती ता. 1 सोमवारला सिंदी पोलिसांकडून मिळाली.