चिंतामणी कृषी उत्पन्न बाजार समिती, लोहारा (जि. यवतमाळ) येथे सुरू असलेल्या परमपूज्य मोरारी बापू यांच्या रामकथेला सलग दुसऱ्या दिवशी पालकमंत्री संजय राठोड यांना उपस्थित राहण्याचा योग लाभला. रामकथेच्या माध्यमातून संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले असून, या माध्यमातून समाजात सद्भावना, मूल्यनिष्ठा आणि ऐक्याचा संदेश दिला जात आहे. परिसरातील भाविक मोठ्या संख्येने या दिव्य सोहळ्यात सहभागी होत प्रभू श्रीरामचंद्राच्या भक्तीत लिन होत आहेत.